महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 161
☆ हे शब्द अंतरीचे… नेत्र… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆/
(अष्ट-अक्षरी)
☆
नेत्र पाहतील जेव्हा, तेव्हा खरे समजावे
उगा कधीच कुठेच, मन भटकू न द्यावे…
*
मन भटकू न द्यावे, योग्य तेच आचारावे
स्थिर अस्थिर जीवन, मर्म स्वतःचे जाणावे…
*
मर्म स्वतःचे जाणावे, जन्म एकदा मिळतो
सर्व सोडून जातांना, कीर्ती गंध तो उरतो…
*
कीर्ती गंध तो उरतो, सत्य करावे बोलणे
राज केले उक्त पहा, पुढे नाहीच सांगणे…
☆
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈