श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ बंध☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

खेकड्याचे ध्यान आहे माणसाचे

चालणारे पाय मागे ओढण्याचे

*

बांधलेला पायगुंता सोडला की

गाढवाला वेड गो-या फुंकण्याचे

*

कावळ्याला रंग आहे कोकिळाचा

ज्ञान नाही उंच ताना मारण्याचे

*

हासुनीया पाहणारा देव होता

कर्मठानी लाड केले सोवळ्याचे

*

ध्येय ठेवा युद्ध अंती जिंकण्याचे

माणसाला श्रेय मिळते साधनेचे

*

वाचनाने वाचवावे जिंदगीला

वर्तनाला बंध बांधा भावनांचे

*

राबण्याला फार मोठे सत्व आहे

शुद्ध सोने होत जाते जीवनाचे

*

व्हा भल्याना सावराया शूर योद्धे

पाय तोडा दहशतीच्या गारध्यांचे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments