सौ. स्वाती रामचंद्र कोरे
कवितेचा उत्सव
☆ शिवजयंती निमित्त – आराध्यदैवत… ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆
☆
बेड्या….गुलामगिरीच्या
झुगारल्या … शिवबांनी
श्वास…मोकळा घेतला
सह्याद्रीच्या….या कणांनी ..||१||
☆
कला..गुणांची पारख
नसे..जातीपाती स्थान
हर एक.,..शिलेदार
स्वराज्याचा…अभिमान…||२||
☆
मावळ्यांच्या..मनोमनी
रुजविला….स्वाभिमान
किल्यांवरी… लहरतो
जनतेचा … अभिमान…||३||
☆
उभे..आयुष्य वेचले
रयतेच्या .. रक्षणार्थ
रणसंग्रामात…होता
तुम्ही कृष्ण…तुम्ही पार्थ ||४||
☆
स्वप्न …स्वराज्याचे पूर्ण
जिजाऊच्या.. हृद्यातले
गड किल्ले… दरी खोरे
पंचप्राण…सुखावले…||५||
☆
कीर्ती.. निनादे त्रिखंडी
मनी..फक्त एक मूर्ती
माझे….आराध्य दैवत
राजे..शिव छत्रपती…||६||
☆
© सौ. स्वाती रामचंद्र कोरे
रा. कवठेमहांकाळ, ता. कवठे महांकाळ, जिल्हा सांगली
मो.9096818972
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈