श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 226
☆ पाचर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
शांत वाटला प्रशांत सागर
तांडव करतो माझा शेखर
*
आमिष मोठे दाखवितो अन
हाती देतो नुसते गाजर
*
हलावयाला जागा नाही
अशी ठोकली त्याने पाचर
*
संस्काराचे कुळ फाशीला
लोक बेगडी त्यांचा आदर
*
सोबत सागर असून माझ्या
तहानलेली माझी घागर
*
हरामखोरी कोठे पचते
कष्ट करूनी खावी भाकर
*
मूषक दिसता दूध सोडुनी
मागे धावत सुटली मांजर
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈