प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
अल्प परिचय
प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी, ज्येष्ठ साहित्यिक
जन्म – 25 डिसेंबर 59
शिक्षण – विद्या वाचस्पती
छंद – बासरी आणि संवादिनी वादन, हरिभजन
साहित्य सेवा – ललित लेख , स्फुट लेख ,कथा लेखन, बऱ्याच दीपावली अंकात, आणि वृत्त पत्रात पण प्रसिध्द
रेशीमकोष काव्य संग्रह, रुद्रमंथन काव्य संग्रह, राज्यस्तरीय पुरस्कारीत
हास्य रंजन – नुकताच ग्रामीण विनोदी कथा संग्रह प्रकाशित
साहित्य संमेलन – सांगली बडोदा
कवितेचा उत्सव
☆ माय मराठी.. ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
☆
फुला माजी मोगरीचे
परिमळे कस्तुरीचे
केकावली मयुरा ची
तैसी गा मायबोली
दुधा मध्ये नवनीत
फुलाते मकरंद
फळांमध्ये आम्रफल
तैसी माझी मराठी
एकेक अक्षर असे
मोतीयांची रास
हिऱ्यामध्ये पैलु खास
सारस्वतांची तैसी आस
धर्मात धर्म मानवधर्म
तेच सारस्वत मर्म
तेची लेखणीचे कर्म
माय मराठी
सह्याद्रीच्या ठाय
सरस्वती ती माय
कामधेनू गाय
साहित्य सरिता
जशी स्वरांची श्रुती
गायकाची स्मृती
तैशी गा सरस्वती
शारदा माझी
नादात नाद अनाहत
तैशी बोली आहत
भाग्य आमचे थोर
आम्ही गातो मराठी
संत पंत तंत
ज्ञानेश्वर तुका एकनाथ
शाहीरांची साथ
दासोपंतांची पासोडी
विष्णुदास भावे थोर
दीनानाथ मंगेशकर
देवल ते किर्लोस्कर
कुसुमाग्रज कानिटकर
मराठी नाट्य संगीत
हातामध्ये घालून हात
चळवळ विराजीत
गुढी सजली मायबोलीची
भाषा हीच गुरू
सर्व जनाशी अधारू
भावनाचे कल्पतरू
साहित्य सरिता
☆
© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
नसलापुर बेळगाव
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈