श्री आशिष बिवलकर
कवितेचा उत्सव
☆ अभिमान मराठी ☆ श्री आशिष बिवलकर ☆
☆
माय मराठीच्या दुधाची
साय मी खातो!
गोडवे अभिमानाने
तिचे मी गातो!
*
अमृताहून असे
मायमराठी गोड!
ज्ञानदात्या सरस्वतीला
तिचेच असे ओढ!
*
काय सांगू अल्पमती मी
तिची थोरवी!
हेवा करी तिचा तो
तेजपुंज रवी!
*
काय सांगू तिची
ती शीतलला!
शशीला हेवा वाटे
पाहून कोमलता!
*
तिच्या कुशीत बागडले
थोरसंत अन् महाकवी!
गद्य,पद्य, कथा, पटकथा,
रसाळ गाथा अन ओवी!
*
तिची लेकरे लावती
झेंडे अटके पार!
दिल्लीचे तख्त राखती
पराक्रम गाजवी अपार!
*
मोकळे पणाने
होतो मराठीत व्यक्त!
धमन्यातून सळसळे
माय मराठीचे रक्त!
*
अभिजात असे माझी
मराठी भाषा!
अज्ञानास ज्ञानी करी
तिच्यात आशा!
*
उंची तिची मोजताना
थिटे पडे आकाश!
उदरातुन तिच्या वाहे
ज्ञानाचा प्रकाश!
वास्तवरंग
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈