प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
कवितेचा उत्सव
☆ महिला दिनानिमित्त… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
☆
अनेक नाती तुझ्यात गुंतती
कुंठित होते मती
नाही शोभा ह्या जगला नाही
कोणती गती
सुगंध जसा दरवळवा
भिजत जाते माती
भाव भावनांचा बांधून झुला
शब्द शब्द पाझरती
सर्व काही सोडून येशी
तृषार्थ त्या पणती
कळीची हे फुल होती
गंध बंध उमलती
तुझ्यामुळे शक्य सखे
जगात जीव जगती
प्रेम ज्योती रात तेवती
उजळीत त्या वाती
तुझे समर्पण ते मी पण
देहाचे तर्पण
चंदन काया झिजे संसारी
नसे कर्ते पण
ज्योत वात फुले फुलवात
वारा तो स्नेहात
उजळे पणती तमोगुणाची
सूर्य अन चंद्रात
☆
© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
8 मार्च 24
नसलापुर बेळगाव
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈