कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 213 – विजय साहित्य
☆ क्रांतीज्योतीची गौरवगाथा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
☆
समाज नारी साक्षर करण्या
झटली माता साऊ रे .
क्रांतीज्योतीची गौरवगाथा
खुल्या दिलाने गाऊ रे . . . !
*
सक्षम व्हावी, अबला नारी
म्हणून झिजली साऊ रे
ज्योतिबाची समता यात्रा
पैलतीराला नेऊ रे . . . . !
*
कर्मठतेचे बंधन तोडून
शिकली माता साऊ रे
शिक्षण, समता, आणि बंधुता
मोल तयाचे जाणू रे. . . . !
*
कधी आंदोलन, कधी प्रबोधन
काव्यफुलांची गाथा रे
गृहिणी मधली तिची लेखणी
वसा क्रांतीचा घेऊ रे. . . . !
*
दीन दलितांसाठी जगली
यशवंतांची आऊ रे
दुष्काळात धावून गेली
हाती घेऊन खाऊ रे . . . . !
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈