मेहबूब जमादार 

? कवितेचा उत्सव ?

शुक्राची चांदणी… ☆ 🖋 मेहबूब जमादार

मी पाहतोय तेथे अजुनीआहे शुक्राची चांदणी

आपले अढळ स्थान  ठेऊन आहे शुक्राची चांदणी

*

कित्येक शतकांच्या आठवणी काळ सांगून गेला

त्या काळांचा इतिहास  सांगते  शुक्राची चांदणी

*

सूर्य उगवतो मावळतो आणि अंधार पडतो

अंधार पडता  पुन्हा उजळते शुक्राची चांदणी

*

गतकालांचे दाखले विझले  पडद्याआड गेले

आपले आकाश भेदून आहे शुक्राची चांदणी

*

आले गेले बरेच अन काळाच्या स्मृतीत गेले

आपले नांव  राखून आहे शुक्राची चांदणी

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments