श्री सुहास सोहोनी
कवितेचा उत्सव
☆ माझा न मी राहिलो… ☆ श्री सुहास सोहोनी ☆
नयनांत माझिया वसलिस तू
वदनांत माझिया लपलिस तू
श्रवणांत माझिया घुसलिस तू
अन् जोड काळजा दिलीस तू
*
चरणास शक्ति “नि” आधार
कंठात पट्टिचा हार
तुमच्याचमुळे मी तगलो
अन् आजवरी मी जगलो
माझाच न मी राहिलो
माझ्यातच मी ना उरलो …
😀😀😀😀😀
ग्यानबाची मेख – ओळींनुसार :
१)लेन्स् २)कवळी ३)कर्ण यंत्र ४)स्टिंग ५)नि रिप्लेसमेंट ६)गळपट्टा
😀😀😀😀😀
© सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈