प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
कवितेचा उत्सव
☆ संत एकनाथ… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
(नाथ षष्टी निमित्त)
☆
पैठण नगरी । गोदावरी तिरी
विठ्ठल श्रीहरी । नांदतसे ।।
संत भानुदास । महंत सज्जन
करितो कीर्तन । वैष्णवांचे ।।
एकनाथ नामे । त्यांचाच वंशज
श्रीहरी अंशज । भक्ती करी ।।
नित्य नेम पूजा । भजन कीर्तन
आणि प्रवचन । सांगतसे।।
वैष्णवांचा धर्म । अस्पृश्य अकर्म
भागवत मर्म । सांगी लोका ।।
अद्वैत सिध्दांत । आहे चराचर
पंचभूत सार । मांडीलासे
एकच सजीव । नांदती सकळ
त्याचा ताळमेळ । जीवलागी।।
आत्माच शाश्वत ।नांदे त्या घरात
श्रीहरी दारात । सर्व एक ।।
कथा निरूपण। अभंग गौळण
केलेस तारण । जगोद्यारा।।
नाथांनी कीर्तन । रचले भारुड
मांडले गारूड । जगासाठी।।
धर्म कर्म सार ।केले प्रबोधन
अस्पृश्य बंधन । नष्ट केले
साक्ष्यात श्रीहरी । श्रीखंड्या बनुनी
घरी भरे पाणी । एकनाथी ।।
ऐसापुण्य संत । लाभला पैठणी
गोदेच्या विराणी । एकरूप ।।
☆
© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
मुपो नसलापुर ता रायबाग, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈