महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 166
☆ अभंग…मनं शुद्ध व्हावे ☆ महंत कवी राज शास्त्री ☆
☆
मनी नसे भाव, म्हणे देवा पाव
फुकटचा भाव, काय कामी.!!
*
सर्वच ठिकाणी, स्वार्थ फक्त शोधी
आणिक उपाधी, शोध घेई.!!
*
वरवडे सर्व, क्रिया आणि कल्प
मनात विकल्प, भरलेला.!!
*
उपास तापास, व्रत नि वैकल्य
कैसे ते साफल्य, होईल हो.!!
*
कविराज म्हणे, मनं शुद्ध व्हावे
बाकीचे सोडावे, कृष्णावरी.!!
☆
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈