श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 231
☆ आॕनलाईन ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
आॕनलाईन खरेदीचा रोग मला जडला
बँक खात्यामधला होता पैसा खर्ची पडला
*
नव्हती फार हालचाल देह थोडा वाढला
दम लागतो मला आता जर जिना चढला
*
वेळेवरती येई पिज्जा पोटामध्ये ढकला
मनातून धन्यवाद देऊन टाका कुकला
*
स्वयंपाकाचा घरात प्रसंग नाही घडला
भाजीचा मी देठ कधीही नाही होता खुडला
*
एकदा केला प्रयत्न प्रसंग बाका घडला
होता पहिल्या घासाला नवरा माझा रडला
*
बाहेरच्याच खाण्यावर जीव माझा जडला
त्याचसोबत औषधानं जीव थोडा पिडला
*
सुई पासून सारं काही येत होतं घरला
घरामध्ये बॉक्सचाच होता कचरा भरला
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈