प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
कवितेचा उत्सव
☆ वसंत… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
☆
झुला झुलवीत आला फुलवित
वसंत ऋतूची पालखी सजवीत ।।ध्रु।।
*
इवले इवले तृणांकुर पाते
दवबिंदूंचा सडा शिंपीत
अवखळ खट्याळ वारा तोही
आला रानात शीळ घालीत
*
केतकी वनी साद तयारीत
मोर पिसारा आला खुलवित
कुपी मधील सुगंध कस्तुरी
क्षितिजावर हळूच सांडीत
*
अलवार भिजे रान तिथें
स्वर उमटले त्या बासरीत
अधर कटीचा शेला घालून
चाल बदकाची होती ऐटीत
☆
© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈