कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 216 – विजय साहित्य ?

संत एकनाथ ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

(अष्टाक्षरी रचना)

भानुदासी कुळामध्ये

एकनाथ जन्मा आले.

वयवर्षे फक्त बारा

जनार्दने गुरू केले.

*

दत्त दर्शनाचा योग

देवगिरी सर्व साक्षी

तीर्थाटन करूनीया

आले पैठणच्या क्षेत्री.

*

नाथ आणि गिरिजेचा

सुरू जाहला संसार

गोदा,गंगा, आणि हरी

समाधानी परीवार.

*

बोलीभाषेतून केले

भारूडाचे प्रयोजन.

लोकोद्धारासाठी केला

अपमान  ही सहन.

*

ईश्वराचे नाम घेण्या

नको होता भेदभाव

एकनाथी रूजविले

शांती, भक्ती, हरिनाम.

*

नाना ग्रंथ निर्मियले

लाभे हरी सहवास.

विठू, केशव, श्रीखंड्या

नाथाघरी झाला दास.

*

दत्तगुरू द्वारपाल

नाथवाडी प्रवचन

देव आले नाथाघरी

नाथ देई सेवामन.

*

नाथ कीर्तनी रंगल्या

गवळणी लोकमाता.

समाधीस्त एकनाथ

कृष्ण कमलात गाथा.

*

केले लोक प्रबोधन

प्रपंचाचे निरूपण.

सेवाभावी एकनाथ

भक्ती, शक्ती समर्पण.

*

वद्य षष्ठी फाल्गुनाची

नाथ षष्ठी पैठणची

सुख,शांती,धनसौख्य

नाथ कृपा सौभाग्याची.

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments