श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ झाड… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
बीज नामी होउनीया अंकुरावे
माणसाने वाटते मज झाड व्हावे
*
ऊन वारा पावसाने ओल द्यावी
झाड मातीने सुखाने वाढवावे
*
ऐतखावू सावजाना सांग देवा
स्वावलंबी जीवनाला मोल यावे
*
घेतला आहे वसा तो चालवाया
आपले जगणे जगाला सोपवावे
*
मानवी स्पर्धाच सा-या संपवाव्या
वास्तवाने जीवनाला सावरावे
*
झाड आहे केवढा आदर्श येथे
नेमके औदार्य त्यांचे आठवावे
*
शेवटी संन्यस्त वृत्ती घेतली की
गरजवंतालाच जगणे दान द्यावे
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈