प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
कवितेचा उत्सव
☆ निशा… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
☆
शुभ्र शुक्र चांदणी
उजळे नभांगणी
चंद्रासह रोहिणी
एकांतात मोहिनी
*
रात चैत्र पुनवेची
रात राणी बहरली
गंध मंद मादकता
मुग्ध कळी उमलली
*
स्पर्शातील कोमलता
लाज गाली हासली
हात हाती मुलायम
नाजूकता बहरली
*
शुभ्र दाट चांदणे
केतकीचें हसणे
मोराचे पद लालित्य
सुखात त्या भिजणे
*
सर्व काही तेच तेच
सृष्टीचे खरे स्वरूप
अनादी आंनत युगे
मानवीय ते रूप
☆
© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈