सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ‘मन पाखरा रे…’ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

(देवप्रिया~ गालगागा गालगागा गालगागा गालगा)

मानसीच्या पाखरा रे पिंजरा हा तोड तू

कोंडलेल्या भावनांना या अशा रे सोड तू

*

खूप झाली बंधने अन खूप झाले सोसणे

संपली सारीच शक्ती बांध आता फोड तू

*

अंतरीच्या वेदनांना सांग का लपवू कसे?

सागराची लाट उठली जा अशी ती मोड तू

*

मोरपंखी स्पर्श सखया रोमरोमी साठला

सोबतीला राहुनी बघ जीव आता जोड तू

*

भ्यायचे नाही जराही बोलुदे काही कुणी

का तमा पण बाळगावी मान नाते गोड तू

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

२२/०४/२०२४

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments