कविराज विजय यशवंत सातपुते
☆ विजय साहित्य ☆ राजमाता जिजाऊ ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
राजमाता जिजाऊने
इतिहास घडविला
सिंदखेड गाव तिचा
कर्तृत्वाने सजविला.. . . !
उभारणी स्वराज्याची
शिवबाचा झाली श्वास
स्वाभिमान जागविला
गुलामीचा केला -हास.. . . !
सोनियाच्या नांगराने
जनी पेरला विश्वास
माता, भगिनी रक्षण
कर्तृत्वाचा झाली ध्यास.
माय जिजाऊची कथा
मावळ्यांचा काळजात
छत्रपती शिवराय
दैवी लेणे अंतरात.. . !
वीरपत्नी , वीरमाता
संघटीत शौर्य शक्ती
भवानीचा अवतार
चेतविली देशभक्ती.. . . . !
© विजय यशवंत सातपुते
यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.
मोबाईल 9371319798
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈