श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ पाऊसरेघ… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
☆
वृक्षाच्या छायेखाली ,
उतरेल माज उन्हाचा.
शोधता सावलीला ,
लागला माग वार्याचा .
जमतील कदाचित येथे,
नभी अचानक मेघ.
क्षितिजावर आशेच्या कधीही,
उमटेल पाऊसरेघ.
☆
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈