महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 179
☆ पाऊस तुझा नि माझा… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆
☆
पाऊस तुझा नि माझा
तफावत खूप आहे
तुज आवडे रिमझिम
माझे मन, त्यात नं राहे.!!
*
पाऊस तुझा नि माझा
एकच छत्री मला हवी
त्या पावसात सोबती
मज बिलगून तू रहावी.!!
*
पाऊस तुझा नि माझा
कधीच सोबत येत नाही
मी पाहतो वाट तुझी अन्
पाऊस माझा, अंत पाही.!!
*
पाऊस तुझा नि माझा
खेळतो पाठशीवणीचा खेळ
गरम गरम चहा पिण्यातच
जातो मग आपला वेळ.!!
☆
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈