श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ वृक्षारोपण... ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
माझीया मनात अंकुर फुलावे
पानात झुलावे दृष्टीगगनी.
*
मातीही हसावी सदैव बहर
वाढिचा कहर निसर्गसखा.
*
हळूच शाखांत पोक्तले रोपटे
वृक्षही चौपटे सावलीझुले.
*
विश्राम जीवाला थकल्या पांथस्था
फळेही हसरी रानराज्यात.
*
ढगास आळवी वार्याशी सलगी
वाजती हलगी गडगडात.
*
मानवा संदेश पाऊस पडतो
वृक्षाशी छेडतो चक्रकारण.
*
युवांची ताकत युगाला घोषीत
श्वासाला पोशीत वृक्षारोपण.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈