श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 244 ?

प्रीतिची शिल्लक ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

वार एवढे नको करू तू  पाठीवरती

अनेक जखमा तुझ्याच आहे नावावरती

*

हृदय वाहुनी तुला टाकले नको काळजी

वार झेलण्या मीही तत्पर छातीवरती

*

जुने वाद ते नकोच आता उकरुन काढू

बोलत जा ना कधीतरी तू प्रेमावरती

*

साक्षर नव्हती बहिणाबाई तरी प्रतीभा

बहिणाईला ओव्या सुचल्या जात्यावरती

*

युद्धासाठी तो आलेला रणांगणावर

शर नाही तर गुलाब दिसले भात्यावरती

*

नको वल्गना नकोच चिंता नकोच संशय

शुद्ध भावना डाग नसावा नात्यावरती

*

नको बंगला नकोच गाडी प्रेम असावे

मज प्रीतिची शिल्लक दिसुदे खात्यावरती

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest


0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments