प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
कवितेचा उत्सव
☆ भूपाळी स्वामींची… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
☆
झाली पहाट झाली स्वामी
जागे व्हा आता
स्वामी जागे व्हा आता
भक्त गण अतुरला
तुमच्या दर्शनी राऊळा
☆
गंगेचे उदक आणले
मुख प्रक्षाळा स्वामी
मुख प्रक्षाळा
किलबिलाट झाला
पक्षी झाले हो गोळा ।। 1 ।।
*
घातला धूप तो भक्ती भावाचा
भक्ती भावाचा
पंचप्राणाची पंचारती
ह्या देही ओवळीता ।। 2 ।।
*
स्नानासाठी आणले, काशी उदक,
स्वामी काशी उदक
दवणा मरवा सुगंधी,
हिना अत्तर
कस्तुरीची उटी लावली भाळा,
लावलीया भाळा
उठा उठा स्वामी दर्शन द्या सकळा ।। 3 ।।
*
सुगंधी फुले, पंचामृत, केशरी
पेढे, स्वामी दूध अन पेढे
नैवेद्यपात्री गोड धोड फळे
*
उठा उठा स्वामी आता
दर्शन द्यावे मुख कमळा
झाला अरुणोदय सरली
निद्रेची वेळा । । 4 ।।
☆
☆ तत्सद स्वामी अर्पणास्तू ☆
© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈