कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 229 – विजय साहित्य
☆ अर्णवाची लाट…! ☆
☆
झालो अर्णवाची लाट
चालू पंढरीची वाट || धृ ||
*
ज्ञानदेव तुकाराम
अखंडीत जपनाम
झालो पालखीचे भोई
वैष्णवांचा थाट माट ||१ ||
*
पालखीच्या पुढेमागे
जोडी संचिताचे धागे
कैवल्याची चंद्रभागा
उचंबळे काठो काठ ||२ ||
गावोगावी जाई वारी
सांगे संकट निवारी
बुक्का अबीर गुलाल
रंगे रंगांत ललाट ||३ ||
*
भक्ती भावनांचा रंग
तन मन झाले दंग
पांडुरंगी शिंपल्यात
कृपा प्रसादाचे ताट ||४ ||
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈