श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ जीवाचा जिव्हाळा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
डोईवर छान / शोभे वृंदावन
हातात निशाण / वैराग्याचे
*
एकरूप झाले / निर्गुण सगूण
धरता चरण / देवा तुझे
*
मनाला लाभते / नवीन उभारी
करताना वारी / पंढरीची
*
फाटका संसार / नेटका करीन
सुखात ठेवीन / घरदार
*
कृपाळू माऊली/ जीवाला लाभली
काया वेडावली /अभंगात
*
नित्य तुझी सेवा / घडो देवराया
मला तारावया / संसारात
*
जसा तुकोबांचा /झालास तू श्वास
मनाला विश्वास / तोच राहो
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈