श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

रंजना जी यांचे साहित्य # 183 – आनंद पाखरू☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

कसे लुप्त होई।

आनंद पाखरू।।

पाहे जाता धरू।

न ये हाती॥१॥

*

इथे तिथे जरी।

सर्वत्र भरला।।

तरी अतुरला।

मानव का ॥२॥

*

उगा शोध जगी।

काखेत कळसा।।

घेतसे वळसा ।

आनंद हा ॥३॥

*

आनंद अत्तरा।

जाणूनी घेशील ।।

भरुनी देशील ।

गंध मना॥४॥

*

किती जगती रे।

तृण फुले सान।।

आनंदा उधाण।

एक दिन॥५॥

*

अखंड चिंतन।

भूत भविष्याचे।।

क्षण आयुष्याचे।

मोदाविन॥६॥

*

नर देह श्रेष्ठ।

चौऱ्यांशी योनीत।।

फिरला भोगीत।

हव्यासात॥७॥

*

दिल्याने वाढते।

आनंदाचे धन।।

तृप्त होई मन।

सदोदित॥८॥

*

मनाचे पाखरू।

स्वच्छंदी उडू दे।।

वारी ही घडू दे।

स्वर्गाचिया ॥९॥

*

कवनी सुमने।

रंजना माळते।।

आयुष्य चाळते।

पदोपदी…!॥१०॥

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments