सौ. रेणुका धनंजय मार्डीकर
कवितेचा उत्सव
☆ “फिरून आली तुझी आठवण…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆
(नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना मानाचा मुजरा पावनखिंडीतील चित्त थरारक शौर्याचा ऐतिहासिक आठवण)
*
आज अचानक फिरून आली तुझी आठवण
बलिदानाने पवित्र झाली तुझी आठवण
*
स्वराज्य रक्षण करण्यासाठी पहा मावळे
पन्हाळ्याहून घोडखिंडीत तुझी आठवण
*
मंतरलेल्या रात्री मग प्राणांची बाजी
सहा हजारा पुरून उरला तुझी आठवण
*
तलवारीचे वार झेलले निधडी छाती
यमधर्माला थांबवणारी तुझी आठवण
*
तोफांचा आवाज ऐकुनी प्राण सोडला
राजासाठी बलिदानाची तुझी आठवण
*
पावन झाली घोड खिंड ही रक्त सांडले
पावनखिंडीत नरवीरा रे तुझी आठवण
*
बाजीप्रभूस मुजरा माझा अभिमानाचा
प्रताप सारा आठवणारी तुझी आठवण
☆
© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर
औसा.
मोबा. नं. ८८५५९१७९१८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈