श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 249
☆ कात टाकतो मी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
येता समीप थोडा धुंदीत चालतो मी
रानात केतकीच्या गंधात नाहतो मी
*
माझ्या मनात ठसली ती केतकी सुगंधी
पाहून केतकीला जुन कात टाकतो मी
*
असतात डंख काही प्रेमातही विखारी
घायाळ केतकीच्या प्रेमात वाटतो मी
*
आनंद सोबतीला नसतो कधीच कायम
जखमेस सोबतीला घेऊन जागतो मी
*
होतेय फार जळजळ जागेत तेवढ्या ह्या
उगळून चंदनाचा थर फक्त लावतो मी
*
आहेत सर्प काही वस्ती करून येथे
केवळ तुझा निरागस गुण गंध मागतो मी
*
माझ्यात केतकीचा आलाय गंध थोडा
येतात साप जवळी दचकून पाहतो मी
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈