श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 251
☆ नीति… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
नीति खेळ खेळवते
माणसास नागवते
*
आडवाट नको धरू
तीच वाट भूलवते
*
महालात सुख टोचे
रोज झोप चाळवते
*
अमृतात कुणीतरी
कसे वीख कालवते
*
पुरूषार्थ जागताच
अग्निकुंड पेटवते
*
निसर्गात महाशक्ति
तीच विश्व चालवते
*
धनवानस मोठ्याही
नीति साफ टोलवते
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈