सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

? कवितेचा उत्सव ?

☆ 💦 श्रावणसरी ☆ सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

 आला साजरा श्रावण..

 कानी येई रुणझुण..

 ओथंबले मेघ नभी 

 वारा घालीतो विंझण..

 असा श्रावण श्रावण… |

*

 आला साजरा श्रावण 

 पावसाचं येणं जाणं..

 कधी सरीवर सर 

 कधी उन्हात खेळणं..

 असा श्रावण श्रावण… |

*

 आला साजरा श्रावण 

 मेघ गर्जे निनादून..

 बिजलीच्या संगतीत 

 पर्जन्याचं बरसण..

 असा श्रावण श्रावण…

*

 आला साजरा श्रावण

 भूमी भिजे कणकण..

 स्वर विश्वात न्हाऊनी

 ओलावते तिचे मन..

 असा श्रावण श्रावण..

*

 आला साजरा श्रावण 

 मयूर करी नर्तन..

 कळ्या फुले फुलताना 

 भ्रमर करी गुणगुण..

 असा श्रावणश्रावण…

*

 आला साजरा श्रावण 

 श्रद्धा -भक्तीच आंदण..

 पूजा अर्चा- धूप दीप

 रंगतात सारे सण..

 असा श्रावण श्रावण…

*

 आला साजरा श्रावण 

 उपवास जागरण..

 हळुंवार ऐकू येई

 मनी बासरीची धून..

 असा श्रावण श्रावण…

*

 आला साजरा श्रावण 

 चिंब होई माझे मन..

 कवितेत रमताना 

 ओठी श्रावणाच गाणं..

 असा श्रावण-श्रावण…

💦🌨️.

©  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments