श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “श्रावण” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्रावण कधी जात येत नसतो

ऊन पावसाचा लपंडाव

थांबायचं नाव घेत नसतो

आयुष्याचा हाच निसर्ग असतो

श्रावण नेहमी इथेच असतो…

*

कधी सावली प्रेमाची

कधी ऊन विरहाचे असतो

कधी हवा अशीच रिकामी

कधी कवडसा उजळत असतो

श्रावण नेहमी इथेच असतो…

*

नद्या नाले ओसंडून वाहता

कोपरा एखादा कोरडाच राहतो

जगायची शक्यता नसता

कोंब एखादा आकाशी जातो

श्रावण नेहमी इथेच असतो…

*

दरीत श्रावण खस्ता खातो

उंचीवर थोड्या रम्य भासतो

शिखरावर ध्यानस्थ योगी होतो

जात येत तर मी असतो….

श्रावण नेहमी इथेच असतो…

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments