सौ. वृंदा गंभीर
कवितेचा उत्सव
☆ सार्वजनिक गणपतीची प्रेरणा… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆
☆
होता ब्रिटिशांचा काळ
भारतीय होते पारतंत्र्यात
आली होती गुलामीची वेळ
ठिणगी पेटली स्वातंत्र्याची मनात
*
काय करावे कसे होईल
देश स्वतंत्र करण्यासाठी
कोण कसे साथ देतील
सेवक राहतील उभे पाठी
*
झेंडा घेतला हाती तरुणांनी
फिरू लागले गावोगावी
माफी मागितली लोकांनी
जसे आहे आम्हा तसे ठेवी
*
टिळक आले सोलापूरला
आजोबा गणपतीची आरती
सुरु झाली प्रचंड गर्दी जमली
लोक आरती करून प्रसाद घेती
*
प्रेरणा मिळाली टिळकांना
विचारचक्र सुरु झाले मनात
गणेश उत्सव सुरु करून
स्वातंत्र्य मिळवू एकमत
*
सुरु केला गणेश उत्सव
जमू लागले भाविक फार
टिळकांनी जनतेचा घेतला ठाव
बदलले जनतेचे विचार
*
झाला स्वातंत्र्यासाठी संघर्ष
प्रेरणा मिळाली सोलापुरातून
उत्साहात होते बाप्पाचे आगमन
घराघरात बसती बाप्पा येऊन
– दत्तकन्या
☆
© सौ. वृंदा गंभीर
न-हे, पुणे. – मो न. 8799843148
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈