श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 255
☆ फुकाची कमाई ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
नको काम धंदा फुकाची कमाई
विकू शेत खावू कुळाची कमाई
*
असे काम त्याचे नसे त्यास दर्जा
लुटारू म्हणे ही बळाची कमाई
*
समाजास भोळ्या भले ठगविणारे
जिथे अंधश्रध्दा बुवाची कमाई
*
कुठे काम नाही तरी आणतो हा
विचारी न कोणी कशाची कमाई
*
जगी काम मोफत करी सिंचनाचे
कुठे होत आहे नभाची कमाई
*
दुवा ईश्वराशी मला साधण्याला
दिली दक्षिणा ती भटाची कमाई
*
करी कष्ट त्याला कुडे दाम मिळतो
मिळे ज्यास ठेका तयाची कमाई
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈