प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
कवितेचा उत्सव
☆ गौर गणेश भोजन… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
☆
भक्त देती तुज आमंत्रण
ये गौराई करावे भोजन ।। धृ ।।
*
सडा रांगोळी दारी घातली
शुभ चिन्हानी पुलकित झाली
सजले अंगण बांधून तोरण
ये गौराई घ्यावे भोजन ।। 1 ।।
*
महिरपी तो मंडप सजला
मन्त्र उच्चारव गगनी भिडला
पंचपक्कवाने नैवेद्य मांडीला
फिटले पारणे धन्य ते लोचन
ये गौराई घ्यावे भोजन ।। 2 ।।
*
रौप्य जडीत तुझे आसन
भरजरी नेसवुन पितवसन
पक्वान्ने ते ताट सजवून
संतुष्ट मनाने करावे ग्रहण
ये गौराई घ्यावे भोजन ।। 3 ll
*
सकळ कळांची माय गाथा
तुझ्या चरणी विनम्र माथा
सर्व सृष्टीची तूच त्राता
तुझ्या कृपेला करुनी वंदन
तृप्त होऊनी घ्यावे भोजन ।। 4 ।।
☆
© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈