श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
☆ कवितेचा उत्सव ☆ चाहूल… ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
चाहूल कशी लागते बकुळीला तुझ्या येण्याची
वेळ साधते बघ ती तुझ्या गालावर फुलण्याची.
ओढ कशी लागते पुन्हा इश्क जगण्याची
वर्दी कोण देते ग मनाला तुझ्या येण्याची.
ऊर्मी येते कुठून पुन्हा घायाळ होण्याची
हौस फिटली न अजुनी माझी दर्द सहण्याची.
उमगली न मला अजुनी तऱ्हा तुझ्या प्रेमाची,
भाषा कधीच न कळली तुझी गूढ जपण्याची.
येतील जातील वर्षे,यत्न दुःखे विसरण्याची
वहिवाट हीच जीवनी बकुल टिपण्याची.
© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈