सौ.अश्विनी कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ भूमिका… ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆
☆
प्रत्येकजण
कधी न कधी जातो,
एखाद्या-एखाद्या भूमिकेतून…
ती निभावताना,
कितीतरी वेळा ती आवडते,
कधीतरी नावडतीही होते
कधी ओझं वाटू लागत,
तर कधी मोरपीस फिरल्यासारखं!
जबाबदारीच्या बेड्या म्हणू की,
सिव्हासन?
किती काहीही म्हटलं म्हटलं तरी,
स्विकारावंच लागत,
भूमिकेतील आपल अस्तित्व
तेव्हा कळत,
भूमिकेचं श्रेष्ठत्व,
महत्व,
भूमिकेच्या,
दूरदुरवरून चालत आलेल्या कथा,
थोड्या फार इकडे तिकडे,
कमी जास्त फरकाने…
आपल्या व्यथाही होतात कथा…
पण बजावावीच लागते भूमिका,
चेहऱ्यावरचं हास्य शाबूत ठेऊन…
☆
© सौ अश्विनी कुलकर्णी
मानसतज्ञ, सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491 Email – [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈