श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
🙏 अनोखा फराळ !🙏 श्री प्रमोद वामन वर्तक
लाडवाचा गोडवा
ठेवा जिभेवर,
पण काटा चकलीचा
नसावा त्यावर !
*
चिवड्याचा खमंगपणा
स्वभावात असावा
पण शेवेचा तिखटपणा
त्यात नसावा !
*
चिरोट्यांचे पापुद्रे
असावेत मनाला,
जाळीदार अनारसे
त्याच्या सोबतीला !
*
करंजीचे सारण
खरपूस असावे,
कुरकुरीत कडबोळे
तोंडात विरघळावे !
*
खारे अथवा गोड
शंकरपाळ्यांना नाही तोड,
दिवाळी सर्वांची
होऊ दे गोड गोड !
दिवाळी सर्वांची होऊ दे गोड गोड !
© श्री प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈