प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ दीपोत्सव… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

दीपोत्सव हा गुणी जनांचा गरीबांचा हो कसा

कष्ट करणे कष्ट करणे हाच तयांचा वसा..

रोज भिडावे कामाला मग अन्नामृत ते मुखी

ना तर होते प्रजाच सारी घरातली मग दु:खी…

*

रोज दिवाळी महाली होते नवी नवी साजरी

सोने रूप्याच्या नित्य सांडती उतू जाती घागरी

शिवकाशीला इवले हात वळती फटाके पहा

गरिबी म्हणते अरे लेकरा तू इथेच रहा..

*

नकाच उडवू जन हो फटाके कशास करता राख

त्यापरीस गरीबांची ऐका पिळवटणारी हाक

मुलास घ्या एखाद्या दत्तक शिकवा त्याला खूप

झोपडीतले जाणून घेऊ दैन्य तयाचे रूप…

*

असेल पैसा जादा तर हो बांधून द्या घरकूल

सुखे नांदतील सावलीत हो आई बाप नि मूल

रोजगारही मिळवून द्यावा कमवा शिका म्हणावे

करंगळी लावून आपली गांजल्यास उठवावे…

*

माणुसकीला जागा जन हो करा करा परमार्थ

आजूबाजूला नजरा वळवा नको फक्त स्वार्थ

न्यावयाचे काहीच नाही देऊन थोडे जाऊ या

नाव कीर्ति मागे राहिल असे काही करू या..

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments