सुश्री नीलांबरी शिर्के
कवितेचा उत्सव
☆ भाऊबीज… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
माहेरचे संस्कार घेऊन
ती सासरी नांदण्या जाते
आपुलकीच्या वर्तनातुनी
आपलेसे सर्वांना करते
*
ती नसते तिथल्या रक्ताची
मुले पण त्यांच्या वंशाची
निसर्गाची हिच संरचना
होऊन जाते ती त्या घरची
*
भाऊबीजेचा दिन येता
ओढ लागते माहेराची
तबकातील दो निरांजने
एकेक पुतळी दो डोळ्यांची
*
त्या डोळ्यांच्या ज्योतीसह
भावाचे ती औक्षण करते
बळीराजासम राज्य इश्वरा
भावासाठी मागत रहाते
*
भावाचे औक्षण करताना
नात्याला आयुष्य मागते
नाम कपाळी डोई अक्षदा
माहेराचा ती दुवा सांधते
🪔🪔
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈