सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ निसर्गाची उधळण☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

येईल अवचित हस्ताची सर,

नाचत नाचत अवनी वरती!

 थेंब थेंब तो फुटून येतो,

 उधळण करीत धरणी वरती !…१

*

ओले, हिरवे गवत डुलते,

रान फुले ही डोलत वरती!

अवघी अवनी फुलून येते,

नवचैतन्याने गाणी गाती !….२

*

निसर्ग साजरा मनास भुलवी,

फिरवी त्याची अत्तरदाणी!

गंधित ,रंगित रानफुलांची,

कुपी उधळते भवताल झणी!…३

*

कधी वाटते झुळूक बनावे,

‌हाती घेऊन गुलाब दाणी!

शिंपीत जावे गुलाब पाणी,

संध्या समयी वातावरणी!…४

*

कधी वाटते फुलपाखरू व्हावे,

उडत फुलावर रंगबिरंगी !

कधी वाटते भ्रमरच व्हावे,

मिटून जावे कमळाच्या अंगी!…५

*

मनात गुंजन होते कविच्या ,

निसर्ग किमया वर्णू किती!

सहस्र रुपे ओंजळ त्याची,

ओततो तोही या भू वरती !…६

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments