श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ नोंद… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

जीव झाला इथे गुंतण्या सारखा

काळ आहेच हा नोंदण्या सारखा

*

पावले वाजली ओळखीची जरा

साद होता तिच्या बोलण्या सारखा

*

कोण आले इथे लुप्त झाले कुठे

कोण भेटेल का सांगण्या सारखा

*

फार आहे जुना आरसा लाडका

चेहरा दावतो पाहण्या सारखा

*

स्वप्न जपले मनी पाहताना तिला

जोड जोडायचा शोभण्या सारखा

*

मीच आहे सखा तिचं माझी सखी

प्रश्न आहे कुठे शोधण्या सारखा

*

नाव फोडू कसे गूज सांगायला

घोळ आहे पुढे गाजण्या सारखा

*

छान मुद्दे कसे मांडतो हा नवे

लेख आहे पुरा वाचण्या सारखा

*

नोंद ठेवा जरा मांडुनी चांगली

मामला  हा तसा गोंदण्या सारखा

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments