श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 261
☆ बाप पुजत नाही… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
आम्ही फक्त देव पुजतो
त्यांचे बाप पुजत नाही
कुणी काहीही म्हणू देत
आम्ही त्यांना भजत नाही
*
आम्ही रामालाच पुजतो
दशरथ पुजत नाही
कुणी काहीही म्हणू देत
आम्ही त्यांना भजत नाही
*
आम्ही फक्त कृष्ण पुजतो
वसुदेव पुजत नाही
कुणी काहीही म्हणू देत
आम्ही त्यांना भजत नाही
*
ब्रह्मा, विष्णू, शिव पुजतो
यांचे बाप पुजत नाही
कुणी काहीही म्हणू देत
आम्ही त्यांना भजत नाही
*
सख्खे आई-बाप पुजतो
दुजा बाप पुजत नाही
कुणी काहीही म्हणू देत
आम्ही त्यांना भजत नाही
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈