सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ कवितेचा उत्सव ☆ प्रेम लता ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
सहजची भेटता तू आणि मी,
काही चमकले हृदयीच्या हृदयी!
बीज अचानक मनी पेरले
प्रीतीचे का ते काहीतरी!
तिसऱ्या दिवशी सूर्यप्रकाशी,
बीज अंकुरे मम हृदयी!
प्रेम पाण्याचे सिंचन करिता,
अंकुर वाढे दिवसांमाशी!
मनी वाढली प्रेम न् आशा,
रोप वाढता पाचव्या दिवशी!
प्रीतफूल उमलले त्यावरी,
‘प्रपोज डे’ च्या त्या दिवशी!
फूल प्रीतीचे मिळे मला,
‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी,
फूल बदलले फळात तेव्हा,
परिपक्व प्रेम मिळे हृदयी!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
????