श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ गुलामी ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

मनासी मनांचे पटू लागले

बखेडे जरासे मिटू लागले

*

किती छान आली नवी बातमी

विरोधीच मागे हटू लागले

*

नवा जोम येता मनाला पुन्हा

करायास धंदा झटू लागले

*

मिळू लागले चार पैसे तसे

जुने कर्ज काही फिटू लागले

*

इरादेच सारे नवे बांधले

तसे स्वप्न साधे नटू लागले

*

हसू लागले दैव कामा मुळे

खुळे दु:ख सारे घटू लागले

*

सुखाचा दिलासा मिळू लागता

व्यथांचे पसारे कटू लागले

*

गुलामी कुणाची नको वाटली

तसे बंध खोटे तुटू लागले

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments