☆ आठवते बालपण… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆
☆
आठवते बालपण, मातीतले खेळपण
झटकुनी कपड्यांना, नवा डाव नवेपण
*
लपाछपी खेळताना, अंधारात लपताना
भाता फुले छातीतला, सारे गायब होताना
आता वाटते गंमत, तेव्हा वाटे भीतीपण
आठवते बालपण, मातीतले खेळपण…
*
लंगडीचे लंगडणे, तोल कसा सावरणे
एका पायी धावूनही, नाही कधीच दमणे
राज्य घेण्या सदा पुढे, झूगारुनी दडपण
आठवते बालपण, मातीतले खेळपण…
*
जरी चेंडू कापसाचा, व्रण कधी उठे त्याचा
आई लावता औषध, आव आणे झोम्बल्याचा
किती लागे खूपे तरी, एक साधी फुंकरण
आठवते बालपण, मातीतले खेळपण…
*
अजूनही हाक द्यारे, बघा जमतील सारे
भेटताच एकमेकां, अंगी भरतील वारे
आम्ही विसरलो खरं, शीळ बिन्धास घालण
आठवते बालपण, मातीतले खेळपण…
☆
कवी : म. ना. देशपांडे
(होरापंडीत मयुरेश देशपांडे)
+९१ ८९७५३ १२०५९
https://www.facebook.com/majhyaoli/
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈