श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ सुचते मनात कविता… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
सुचते मनात कविता
फुलते मनात कविता
खुपते मनात कविता
सलते मनात कविता
*
रुजते मनात कविता
भिजते मनात कविता
भिडते मनात कविता
रुसते मनात कविता
*
पण भाग्य थोर माझे
ना विझते मनात कविता
ना विझते कधीच कविता
☆
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈