☆ कवितेचा उत्सव ☆ झाडे ☆ सुश्री मानसी चिटणीस ☆ 

दिवसाच्या ऐन भरात

सळसळणारी ती….

मिटल्या पापण्यांच्या मध्यान्ही,

पांघरतात वेदनांचे पांढरेधोप शेले…

अन् रात्र होताच विरघळू लागतात

त्यांच्या सदेह सावल्यांचे पिसारे

संथ जलाशयांच्या किनारी…

झाडे,

स्थितप्रज्ञ होतात..,निमग्न होतात आराधनेत

उमलणा-या प्रत्येक प्रज्ञेच्या अस्तित्वासाठी

मांडतात आपल्या पानांची आसने…

अन् नम्र होतात

स्वतःचे कणे त्या प्रज्ञेला बहाल करून…..

तेव्हाच कदाचित…

झाडे….

बोधिवृक्ष  होतात….

 

©  सुश्री मानसी चिटणीस

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/म्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments