डॉ. शैलजा करोडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “चष्मा…” ☆  डॉ. शैलजा करोडे

चष्मा चाळीशीचा डोळी

देई प्रौढत्व जाणीव

अनुभव समृद्धिची

भासू ना देई उणीव

*

धुसरले जग सारे

चष्मा सुस्पष्ट करते

अनुभव संपन्नता

जीवनाचे धडे देते

*

सल्ला द्या नवपिढीस

सक्ती मात्र ती नसावी

जुन्या नव्या संगमाची

कास नेहमी धरावी

*

काळ वेळ बदलते

बदलते जग सारे

चष्मा नंबर बदला

दिसतील तेज तारे

*

रंग बिरंगी गाॅगल

दावी दुनिया रंगीन

सकारात्मकता मग

होऊ ना देई मलीन

*

चष्मा घोड्याचा लावून

नाही जगावे जीवन

माणुसकी चष्मा लावा

तत्व जाणावे गहन

© डॉ. शैलजा करोडे (काव्यशलाका)

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments