कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 239 – विजय साहित्य ?

☆ कष्टाची किंमत ☆

(काव्यप्रकार अष्टाक्षरी.)

आंबा चिंच ,जांभुळाची ,

बांधावर झाडी दाट.

बेल,पिंपळ, उंबर,

दावी गायरान वाट. १

*

रामफळ,भोकराने ,

दिली अवीटशी गोडी.

बोर,डाळींब,आवळा ,

नाचे‌ राघू‌‌ मैना जोडी. २

*

पिके नगदी घेताना ,

सोनं  देई काळी माती.

ज्वारी,बाजरी पिवळी,

तेलबिया ,डाळी, हाती.३

*

भुईमुग, कापसाचा ,

आगळाच असे थाट.

मळ्यातल्या पाटावरी,

ऊस वाढे घनदाट.४

*

शालू हिरवा नेसून ,

साद घाली लेकराला.

मोती घामाचे लावती,

शिरपेच वावराला.५

*

जितराब दावणीचं,

जिवलग जोडीदार.

दुध दुभत्याने मिळे,

रोज अमृताची धार.६

*

भाजी भाकरीची गोडी,

नाही येणार कश्याला.

कळे कष्टाची किंमत,

तुझ्या नाजूक खिश्याला.७

*

देई जिवाला या जीव,

गडी माणूस राबता.

गुळपाक पोळीमध्ये,

सण थांबतो नांदता.८

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments